मराठी | English
  Ashes About Us Home Gallery Appeal Audio Books Blog Contact Us  
 
भूमिका
देशाभिमानाची मुस्कटदाबी सहन करायला पाहिजे होती काय? हिंदुत्वाची विटंबना खपवुन घ्यायला पाहिजे होती काय? कधी ना कधी संयमाचा कडेलोट होणारच होता, जो त्या दिवशी झाला. जनसामान्यातून उठुन कुणी नरशार्दुल, दुटप्पी राजकारणाचा संहार करणारच होता, जसा त्या दिवशी झाला. परम वंदनीय मातृभुमीचे तुकडे करणाऱ्या परधार्जिण्या वृत्तीला आळा घालणं गरजेचंच होतं, जो त्या दिवशी घातला गेला....
तो दिवस होता ३० जानेवारी १९४८....!
मुत्सद्दी, धैर्यशील हु. पं. नथुराम गोडसे ह्यांनी आपली भूमिका मांडताना केलेले परखड वक्तव्य ऐका...खराखुरा इतिहास जाणुन घ्या!
 
पार्श्वभूमी
ज्या भूमीवर हिंदू संस्कृती विकसीत झाली, त्या भूमीचा एक तृतियांश भाग अलग करण्यात आला. इंग्रजांनी अनेक वर्षे संधिसाधुपणे राबविलेले फुटीरतावादी धोरण यशस्वी झाले आणि ज्या देशात धगधगता स्वातंत्र्यसंग्राम लढला गेला, तो देश स्वतंत्र होताना दोन देशात विभागला गेला. 'देशाचे तुकडे करायचे असतील तर ते माझ्या प्रेतावरुन करा' असे मोठेपणाचा आव आणुन उद्गारणाऱ्या महानेत्याने परधर्मियांना झुकतं माप दिलं. एवढंच नाही तर, ते त्यांना ५५ कोटी रुपयांचा 'घरचा आहेर' देण्यासाठी सज्ज झाले.
हा अक्षम्य अपराध पोटात घालेल तर तो जातीचा हिंदू कसला...? धीरोदात्तपणे बंदुकीचा चाप ओढणाऱ्या हातातील लेखणीने कागदावर उतरलेली ती अजरामर हौतात्म्यगाथा ऐका 'मान्यवर न्यायर्षी !' मधे.
 
तत्कालिक परिस्थिती
१९४८ साली परिस्थिती बिकट होती. देशाचे विभाजन होऊन सर्वत्र धर्मयुध्द माजले होते. निरपराध हिंदुंवर अनन्वित अत्याचार होत होते. धास्तावलेल्या मनात अंध:कार आणि द्वेष दाटला होता. आणि याला कारणीभुत असलेले स्वधर्मघातकी नेतृत्व प्रार्थनासभा घेण्यात मग्न होते. यांना राजकीय पटलावरुन दूर करण्याशिवाय गत्यंतर होते का...?
तत्कालिन घटना आणि त्याबाबतचे उहापोह श्री. नथुराम गोडसे ह्यांच्या शब्दात ऐका. आजवर जे आपल्यापासुन हेतुपुरस्सर दूर ठेवले गेले, ते राजकीय परिस्थितीचचे विश्लेषण ऐका 'मान्यवर न्यायर्षी !' मधे.
 
चिंतन
सत्यशोधक वृत्तीने झाल्या घटनेची, तटस्थपणे शहानिशा करायची वेळ येऊन ठेपली आहे. किती दिवस आपण पाठ्यपुस्तकात वर्णिलेल्या एकांगी इतिहासावर विश्वास ठेवणार?
दिशाभूल करणाऱ्या तपशीलांवर आपली मतं बनविणार? धोरणशून्य, नेभळट राजकारणाला नेस्तनाबुत करणाऱ्या साहसी कृत्याचा आपण डोळसपणे वेध घेणार की नाही...? त्यावर चिंतन करणार की नाही..?
साथीला आहे श्री. नथुराम गोडसे यांची अमोघ विचारशक्ती, शिवराय, राणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांच्याशी नातं सांगणारा लढवय्या हिंदुत्ववाद...!