मराठी | English
  About Us Home Views Gallery Appeal Audio Books Blog Contact Us  
 
अग्नी हीच ज्याची जातकुळी आहे, देशप्रेम हाच ज्याचा कुळाचार आहे अशा सिंधुनिष्ठ अलौकिक हुतात्म्यांचा हा अस्थिकलश आहे. हा अस्थिकलश जगावेगळ्या हुतात्म्यांचा आहे. अखंड भारताची स्वप्न पाहणार्‍या राष्ट्र-भक्तांचा हा अस्थिकलश आहे.

या अलौकिक हुतात्म्यांच्या अस्थिकलशाचे आजही प्राणपणाने जतन करण्यात येत आहे. मातृभूमीसाठी सर्वस्वाचे बलिदान देणार्‍या, भोंदूपणाचा नि:पात करणार्‍या नथुरामजींच्या पवित्र अस्थि, आजही निखार्‍या प्रमाणे धगधगत आहेत. मना मनात स्फुल्लिंग चेतवणार्‍या इतिहासाची साक्ष देत आहेत आणि विभाजनाच्या वेळी  भारतवर्षाच्या विशाल देहावर जागोजागी झालेल्या जखमा भरून निघण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

सिंधु नदीपासून ते सिंधुसागरा पावेतो अखंड हिंदुराष्ट्र स्थापन होईपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घेऊन हा वाण वसा अखेर प्राचीन सिंधु नदीत अर्पण करणे हेच खरे त्या इतिहास पुरूष हुतात्म्याला दिलेले तर्पण असेल. सिंधु नदी मध्ये हे प्रखर तेजोमय बिंदू मिसळून जाणे हेच त्यांचे खरे श्राद्ध असेल. अखंड भारत हेच अंतिम साध्य अखेरच्या श्वासापर्यंत मानणारा तो अतृप्त आत्मा, तरच परमात्म्यात विलीन होईल.